लांजा : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमधील परसबाग निर्मिती उपक्रमामध्ये जि.प. शाळा लांजा डाफळेवाडीने लांजा तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. शाळेत जून २०२४ पासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शाळेच्या या अत्यंत नावीन्यपूर्ण व ज्ञानवर्धक प्रात्यक्षिक उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात व आनंदात सहभाग घेऊन सृजनशीलतेचा आनंददायी अनुभव विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष घेतला.
शाळेमध्ये परसबाग निर्मिती करताना आधुनिक शेती व यांत्रिक शेती, बैलांचे जोत व ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी करून मशागत करून, अळी तयार करण्यात आली. पालेभाजी, पडवळ, काकडी, टोमॅटो, मिरची, बांगी, घेवडा, दोडका, कारली, झेंडूची झाडे बियाणे लावण्यात आली. शिक्षणावरोबर मुलांना शेती आवड व शेतीविषयक माहिती मिळावी, यासाठी हा उपक्रम शाळेमध्ये राबविण्यात आला.

नुकतेच या उपक्रमाचे तालुका स्तरावर परीक्षण करण्यात आले होते. यासाठी गटशिक्षणाधिकारी सावंग, विस्तार अधिकारी हिरवे, केंद्रामुख चंद्रकांत पावसकर, आयरे यांनी परसबागेचे शासन निकर्षानुसार मूल्यमापन केले. परसबाग निर्मितीत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अनुजा पांचाळ, नगरसेविका दुर्वा भाईशेट्ये, मुख्याध्यापक मनोज रेडिज, शिक्षिका दीपाली यादव, दीपा मुळ्ये, रुक्मिणी कदम-पाटील या सर्वांनी सहभाग घेतला, जागा मालक दिलीप तोडकरी, संजय तोडकरी, विलास तोडकरी यांनी परसबागेसाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून परसबाग दिली.
परसबागेतील भाज्यांचा पोषण आहारात वापर
या उपक्रमासाठी शाळेतील इ. १ली ते ७ वीच्या विद्यार्थी, शिक्षक व पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले होते. या परसबागेतून विद्यार्थांना निसर्गाचा प्रत्यक्ष सहवास लाभत असून, शेतीची माहिती आणि आवड निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. तसेच यामधून तयार होणाऱ्या पालेभाज्या विद्यार्थांच्या शालेय पोषण आहारात वापरल्या असल्याने विद्यार्थ्यांना अत्यंत सकस व पौष्टिक, चवीष्ट आहार मिळत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 10/Dec/2024














