रत्नागिरी : लायन्स क्लब रत्नागिरी मार्फत साने गुरुजींना आपला आदर्श मानणारे श्री देवेंद्र कांदोळकर हे गोव्यातील शाळेतील शिक्षक चांगल्या पगाराची नोकरी सोडून गुजरात मधील भूकंप पिढीत मुलांच्या शिक्षण कार्यात बहुमूल्य योगदान देत आहेत.
कच्छी, गुजराती भाषा येत नसताना त्यांनी येथील मुलांना शिक्षणासाठी तसेच या मुलांना चांगली स्वप्ने देण्यासाठी धडपड करत आहेत. अशा व्यक्तिमत्वाला व त्यांच्या विद्यार्थ्यांना काल भेटण्याचा योग लायन्स क्लब मधील सभासदांना आला. आपल्या प्रांताचे PDG ला उदय लोध हे देखील त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे मुक्कामासाठी असणाऱ्या विद्यार्थ्यांना बिस्किट्स, चिवडा, केळी अशा प्रकारचा खाऊ देण्यात आला व कांदळकर सरांचा सहवास लायन्स क्लब मधील सभासद अध्यक्ष ला,गणेश धुरी, ला दत्तप्रसाद कुलकर्णी, ला विशाल ढोकळे यांना झाला. रात्री अकरा वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:04 10-12-2024














