वाहतूकीस अडथळा होईल असा टेम्पो पार्क करणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी : लांजा बाजारपेठ येथे एका हॉटेलच्या समोर वाहतूकीस अडथळा होईल अशा स्थितीत टेम्पो पार्क करणाऱ्या चालकाविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुहास बाळकृष्ण शिंदे (वय ३२, रा. जावडे ताडकेवाडी, ता. लांजा) असे संशयित टेम्पो चालकाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ८) सायंकाळी सातच्या सुमारास लांजा बाजारपेठ येथे एका हॉटेलच्या समोर निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताने टेम्पो (क्र. एमएच-०८ एपी ४२७३) एका हॉटेलच्या समोर सार्वजनिक ठिकाणी वाहतूकीस अडथळा निर्माण होईल असा लावून ठेवला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल प्रथमेश वारीक यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:17 10-12-2024