पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी जलसाक्षरतेची गरज : शैलेश बुटाला

खेड : पाण्यासाठी आपल्याला संपूर्ण निसर्गावरच अवलंबून राहावे लागते. अजून पर्यंत तरी कोणालाही पाण्याची निर्मिती करता आलेले नाही. त्यामुळे जे काही पावसाचे पाणी आपल्या क्षेत्रात पडते त्या पडणाऱ्या पावसाचा थेंब थेंब जमिनीत जिरवलां पाहिजे. यासाठी सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत स्तरावर पाण्याचा कार्यक्षमतेने वापर करायला पाहिजे. असे प्रतिपादन उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, खेड चे श्री शैलेश बुटाला यांनी केले.

भरणे येथील श्री गणेश मंगल कार्यालय व श्री काळकाई भवन, खेड येथे जलजीवन मिशन अंतर्गत दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते या शुभारंभ प्रसंगी श्री करपे सहाय्यक गटविकास अधिकारी, श्री धनवडे कृषी अधिकारी, ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकारी व जे.पी.एस. फाउंडेशन व अन्य मान्यवर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:40 PM 10/Dec/2024