गावखडी : पावस विभागात महावितरणचा सावळा गोंधळ चालू असून त्यात दिवसेंदिवस अधिकच भर पडत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असून दररोज महावितरण ची बत्ती गुल होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर रूप धारण करत आहे. पावस परिमंडलचे अधिकारी कर्तव्यात कसूर करत असून बेजबाबदार वागण्यामुळे त्याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांची कर्तव्यात कसूर केल्याबाबत त्वरित उचल बांगडी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे पावस विभाग अध्यक्ष संतोष पोकळे यांनी केली आहे.
विज बिलाची तत्परता दाखविणारे अधिकारी जनतेला सेवा देण्यात कमी पडत असून पावस विभागातील जनता नाराज आहे. महावितरण ने याबाबत कामकाजात सुधारणा न केल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा संतोष पोकळे यांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:59 10-12-2024














