रत्नागिरी : शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुलाजवळ मद्यधुंद अवस्थेत असलेल्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार ९ डिसेंबर रोजी रात्री ९ वा. सुमारास करण्यात आली. अजय भाऊ नांदलसकर (वय ४०, मूळ रा. राजापूर, सध्या रा. तेली आळी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस कॉन्स्टेबल किरण डांगे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी रात्री तो प्रमोद महाजन क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूकडील रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत आढळून आला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 11/Dec/2024














