भाट्ये समुद्रात मृत्यूच्या दाढेतून वाचलं दाम्पत्य; स्थानिक मच्छीमार पोलिसांचं थरारक रेस्क्यू ऑपरेशन

रत्नागिरी : भाट्ये समुद्रात समुद्रासोबत खेळण्याचा आनंद दाम्पत्याच्या अंगाशी आला. भाट्ये समुद्रात कोहिनूर पॉईंटच्या खालच्या बाजूला दाम्पत्य गेले. मात्र येण्यासाठी वेळ झाला आणि समुद्राला भरती आली. भरतीमुळे समुद्र खवळला आणि मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळू लागल्या आणि बाहेरून आलेले हे दाम्पत्य या अजस्त्र लाटांमध्ये अडकले.

जीवघेण्या प्रसंगात काय करावे असे असताना या दांपत्याने शहर पोलिसांकडे संपर्क साधला. मात्र अजस्त्र लाटांमध्ये या दाम्पत्याला वाचवण्यात अडचणी येत होत्या. याचवेळी येथे मासेमारी करणारे तरुण बुरहान मजगावकर आणि सुभान बुडये या दाम्पत्यासाठी देवदूत ठरले. जीवाची बाजी लावत या दोघा तरुणांनी अजस्त्र लाटांमध्ये अडकलेल्या या दाम्पत्याला सुखरूप बाहेर काढले. जीवाची सुटका होताच दोघा दांपत्याने दोघा तरुणांचे अक्षरशः पाय धरत आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 11-12-2024