रत्नागिरी : खंडाळा बाजारपेठेत बेकायदा मटका जुगार चालवणाऱ्यावर गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील खंडाळा बाजारपेठेत बेकायदेशीरपणे जुगार खेळ चालवणाऱ्या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार ९ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वा. सुमारास करण्यात आली. गणेश मोहन अवघडे (वय ४६, रा. खंडाळा कोकणनगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस कॉन्स्टेबल रजनिकांत घवाळी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी दुपारी संशयित हा खंडाळा बाजारपेठेत स्वतःच्या फायद्यासाठी विना परवाना कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम बाळगून खेळ चालवत असताना मिळून आला. त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा १ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 11/Dec/2024