रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिर समोरची धोकादायक झालेली वाणिज्य इमारत रत्नागिरी न.प.ने पाडली. या इमारतीतील गाळ्यांमध्ये व्यवसाय करणाऱ्यांनी इमारतीचा ताबा दिल्यानंतर ‘रनप’ने दोन महिन्यांपूर्वी इमारत पाडण्याचे काम सुरू केले होते.
रत्नागिरी नगर परिषदेच्या मालकीची ही वाणिज्य इमारत धोकादायक झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेने इमारतीतील गाळे मोकळे करून ताब्यात देण्याची विनंती गाळेधारकांना केली. हे प्रकरण न्यायालयात गेले होते. गाळेधारकांनी केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही इमारत आणखी काही वर्षे धोकादायक नसल्याचा अहवाल आला होता. ही मुदत संपल्यानंतर गाळेधारकांनी आपल्या ताब्यातील गाळे पूर्ण रिकामे करून रनपच्या ताब्यात दिले. त्यानंतर इमारतीचे पाडकाम सुरू झाले होते. हे काम पूर्ण झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 11/Dec/2024














