रत्नागिरी : तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तरुणाने जबरदस्तीने वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित केले. पिडीत तरुणी कुणाशी बोलली तर तिला शिवीगाळ व मारहाण केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
गोविंद अनंत घवाळी (वय ४५, रा. भारती शिपयार्ड, मिऱ्या बंदर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ऑगष्ट २०२३ सायंकाळी पाच ते ६ डिसेंबर २०२४ च्या मुदतीत मांडवी, टिआरपी, मारुती मंदिर, परटवणे येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित गोविंद घवाळी याचा विवाह झालेला आहे. असे असतानाही त्याने पिडीत तरुणीशी मैत्री वाढवून तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित केले. पिडीत तरुणी कुणाशी बोलली तर तिला वारंवार शिवीगाळ करुन मारहाण केली. या प्रकरणी पिडीतीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी भादवी कलम ६४, ११५ (२) ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक शितल पाटील करत होत्या तपासात पोलिसांनी तरुणास अटक केली. मंगळवारी (ता. १०) संशयितास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शुक्रवारी (ता. १३) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 11-12-2024













