संगमेश्वर : आंबव पोंक्षे गावात महिलांनी एकत्र येत बांधला वनराई बंधारे

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावात ओढ्यांवर वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. गावातील जुवळे वाडी, खालची घडशी वाडी, भुवड वाडीतील विशेष म्हणजे महिलांनी एकत्र येत ५ वनराई बंधारे बांधले. पाणी अडवा पाणी जिरवा या वाक्याला सार्थ करत गावातील महिलांनी पुढाकार घेत हे बंधारे बांधले. यासाठी ग्रामपंचायत सरपंच शेखर उकार्डे यांनी मार्गदर्शन केले. नदीला वाहून जाणारे पाणी दरवर्षी अडवल्याने, भूजल पातळी टिकून राहात असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 11/Dec/2024