रत्नागिरी : कुर्धे आणि मेर्वी येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोघांवर कारवाई

रत्नागिरी : तालुक्यातील कुर्धे आणि मेर्वी येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते ८ वा. कालावधीत करण्यात आली. मुलायमसिंग विरेंद्रसिंग (वय २८, मूळ रा. उत्तरप्रदेश सध्या रा. गावखडी, रत्नागिरी) आणि दिग्विजयसिंग रामहर्षसिंग (२४, मूळ रा. उत्तरप्रदेश सध्या रा. गावखडी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हे दोघेही आपल्याकडे दारू पिण्याचा कोणताही परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी दारू पीत असताना ही कारवाई करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 11/Dec/2024