गुहागर : बांगला देशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा आणि इस्कॉनच्या साधूंची तत्काळ मुक्तता व्हावी, हीच आमची मागणी असल्याचे निवेदन विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले. विश्व हिंदू परिषद गुहागरच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा गुहागर शिवाजी चौक येथून तहसील कार्यालय गुहागर येथे नेण्यात आला. त्यानंतर तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये बहुसंख्य महिला व पुरुषांनी सहभाग घेतला. बांगला देशचे सरकार हिंदूंसोबतच अन्य अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचास मूक संमतीच देताना दिसून येत आहे. त्यामुळे याचा निषेध करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 11/Dec/2024














