चिपळूण : वाहतुकीला अडथळा करणाऱ्या चौघांवर कायदेशीर कारवाई

चिपळूण : वाहतुकीला अडथळा करणाऱ्या आणि पादचाऱ्यांना धोका निर्माण होईल, अशी वाहने उभी करून निघून जाणाऱ्या वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे.

चिपळूण व सावर्डे पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दिलीप नागू नलावडे (वय ५१, रा. भरणेनाका, खेड), मंदार प्रवीण गुढेकर, (३१ रा. दोणवली, ता. चिपळूण), राजेंद्र बळीराम चव्हाण, (५१, रा. येगांव-कुटरे, चिपळूण), सुशांत दिलीप गमरे, (३४,रा. तिवरे, चिपळूण) अशी चिपळूण व सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 11/Dec/2024