रत्नागिरी : जिल्हा उपाध्यक्ष हारिस शेकासन व महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन येथे आगामी सर्व निवडणुका ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, या मागणीसाठी रत्नागिरी स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या प्रसंगी उपस्थित कार्यकत्यांनी आगामी नगरपालिका निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
रत्नागिरीत सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेवेळी शहराध्यक्ष रमेश शहा, जिल्हा उपाध्यक्ष हारिस शेकासन, ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष दीपक राऊत यांनी उपस्थित कार्यकत्याला ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या काँग्रेस पक्षाच्या मागणीबाबतची वस्तुस्थिती सांगितली. रत्नागिरी शहर व ग्रामीण भागात सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या वेळी उपस्थित कार्यकत्यांनी आगामी पालिका निवडणक काँग्रेसने स्वबळावर लढवावी, अशी मागणी केली. यावर शहराध्यक्ष रमेश शहा यांनी सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी बूथ कमिट्या बनवाव्यात, अशा सूचना केल्या. तसेच कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेश काँग्रेसकडे कळवण्यात येतील, असेही आश्वासन दिले.
या प्रसंगी महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली सावंत, तालुका सरचिटणीस काका तोडणकर, आतिफ साखरकर, अस्लम शेख, सुदेश ओसवाल, अनिता शिंदे, जैनुद्दीन सारंग, फहिम, सोनाली, अजहर वस्ता, मेहबूब खतीब व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 11/Dec/2024