राजापूर : राजापूर तालुक्यात अनधिकृतरीत्या वास्तव्य करणाऱ्या रोहिंग्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते अमृत तांबडे यांनी दिले आहे.
पत्रात म्हटले आहे की राजापूर तालुक्यामध्ये रोहिंग्या बांगलादेशी मुस्लिम समाजाचे लोक अनधिकृतरीत्या राहत आहेत. त्या नागरिकांवर तसेच ज्यांनी रोहिंग्या बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांना सहारा दिला आहे, त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. अनधिकृतरीत्या रोहिंगे राजापूर तालुक्यात राहत असतील, तर त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.
मनसेचे अमृत तांबडे आणि संदीप पळसमकर यांनी राजापूर पोलीस ठाणे आणि राजापूर तहसील कार्यालयाला हे निवेदन दिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 11-12-2024














