नवी दिल्ली : देशभरात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. यामुळे पर्वतीय भागातच नव्हे तर आसपासच्या परिसरातही तापमानात घट झाली आहे.
तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीस सुरुवात झाली आहे. उत्तराखंडच्या केदारनाथ धाम येथे बर्फवृष्टी सुरू आहे.
हिमाचल प्रदेशातील आणि उत्तराखंड परिसरात बर्फवृष्टी झाल्याने वाहतुकीमध्ये काही प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत.
2-3 फुटांपर्यंत बर्फ साठल्याने तापमान शून्याहून नीचांकी गेले असल्याचे दिसत आहे.
बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची येथे गर्दी होत आहे.
सोशल मीडियावर बर्फवृष्टीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 11-12-2024














