संगमेश्वर : चवे ते परचुरी असे ट्रकमधून चिरे वाहतूक करताना झालेल्या अपघातात पाच जणांना दुखापत झाली असून, एकाचा मृत्यू झाला होता. हा अपघात शनिवारी (ता. ७) दुपारी उक्षी येथील वळणावर झाला होता. या अपघातातील ट्रकचालक आनंद धनसिंग राठोड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चवे येथे अतुल अनंत सावंत (कोळीसरे, रत्नागिरी) यांच्या मालकीचे चिरेखाण असून, तेथून त्यांच्या मालकीच्या ट्रकमधून चिरे भरून परचुरी बौद्धवाडी येथील बबन पवार यांच्याकडे घेऊन जात असताना उक्षी रेल्वेस्टेशन रोडकडे जाणाऱ्या परचुरी हद्दीत ट्रक उलटला. त्यात चालक आनंद राठोड याच्यासह सिद्धू मोतिराम चव्हाण, शिवाजी भिलू राठोड, अशोक बावू पवार, कुमार तेजू राठोड, रसोमलू राठोड असे अन्य पाच जण होते. अपघातातील या लोकांना काही लोकांनी बाहेर काढून खासगी वाहनाने जाकादेवी येथे प्राथमिक उपचारासाठी नेले असता त्यातील सिद्धू मोतिराम चव्हाण (मूळ रा. कर्नाटक, सध्या रा. चवे) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आनंद राठोड याने बेदरकारपणे ट्रक चालवल्यामुळे अपघात होऊन सिद्धू चव्हाण याचा अपघातात मृत्यू व अन्य नुकसान झाल्यामुळे नुकसानीला जबाबदार म्हणून त्याच्याविरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 11/Dec/2024














