मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रतिष्ठित कपूर कुटुंबीय 10 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला पोहोचले. रणबीर कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर, सैफ अली खान, करिष्मा कपूर, नीतू कपूर, रिद्धिमा कपूर सहानी, आदर जैन हे सर्वजण यावेळी उपस्थित होते.
14 डिसेंबर रोजी राज कपूर यांचा 100 वा जन्मदिन आहे. यानिमित्त कपूर कुटुंबीयांनी खास फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन केलं आहे. त्याचंच आमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यासाठी हे सर्वजण पोहोचले होते.

राज कपूर यांच्या 100 व्या जन्मदिनानिमित्त 13 डिसेंबरपासून 15 डिसेंबरपर्यंत या फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचसोबत राज कपूर यांचे काही चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत.

या भेटीदरम्यान अभिनेत्री करीना कपूरने तिच्या दोन्ही मुलांसाठी खास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऑटोग्राफ घेतला.

मोदींनी करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या तैमूर आणि जेह या दोन्ही मुलांची नावं लिहित एका कागदावर त्यांचा ऑटोग्राफ दिला.
या भेटीदरम्यान मोदींनी कपूर कुटुंबीयांशी बऱ्याच गप्पा मारल्या. अभिनेता सैफ अली खान आणि रणबीर कपूर यांचा मोदींसोबत संवाद साधतानाचा खास क्षण..
करीना कपूरने हे फोटो पोस्ट केले असून त्यावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:20 11-12-2024














