रत्नागिरी : तरवळ नळपाणी योजनेसाठी खोदलेला रस्ता ठरतोय धोकादायक

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील तरवळ येथे जलजीवन मिशन अंतर्गत योजनेच्या माध्यमांतून सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली होती. त्यासाठी तरवळ येथील अंतर्गत मुख्य रस्त्याच्या मधोमध पाईप लाईन टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. खोदलेला रस्ता ठेकेदाराने तात्पुरत्या स्वरूपात बुजवून घेतला पण त्या मार्गावर सतत असणाऱ्या रहदारीमुळे त्या ठिकाणी मोठा चर पडला असून, रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

खोदलेला रस्ता हा मोठ्या उतारावर असल्यामुळे त्या ठिकाणी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. काही वाहन चालक त्यावरून घसरून पडले देखील आहेत. छोटी वाहन दोन चाकी, तीन चाकी वाहने या ठिकाणी घसरतात. ग्रामपंचातीतर्फे संबंधित ठेकेदाराला या संदर्भात विचारणा केली असता त्याने मातीने हा खड्डा बुजवून घेतला पण पावसामुळे त्यातली माती वाहून गेली असून त्याठिकाणी भले मोठे भगदाड पडले आहे.

खोदलेला रस्ता ठेकेदाराने व्यवस्थित बुजवला नाही त्याच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाला येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:42 PM 11/Dec/2024