EVM वर शंका घेणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांनी सुनावलं..

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीने EVM वर शंका घेतली आहे. ठिठिकाणी या EVM संदर्भात आंदोलने देखील करण्यात आली. राज्य सरकारच्या विशेष अधिवेशनात देखील विरोधकांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केलं.

मात्र, महायुतीचे पक्ष लोकसभा निवडणुकांचा दाखला देत ईव्हीएमवर आक्षेप घेणं हास्यास्पद असल्याचे म्हणत आहेत. त्यात, आता ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनीही ईव्हीएमच्या शंकांवर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या प्रतिक्रियेतून निकम यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला.

विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर बॅलोट पेपरवर फेरमतदान घेण्याचा संकल्प केलेल्या माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी गावाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी भेट देऊन ईव्हीएमच्या लढ्याला आणखी जोर दिला आहे. त्यामुळे, राज्यात ईव्हीएम विरोधातील चळवळ आणखी तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे महायुतीचे प्रमुख नेते महाविकास आघाडीने आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला देत आहेत. आता, उज्ज्वल निकम यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विरोधकांना सल्ला दिला आहे. काही लोक EVM बाबत रान पेटवत आहे. मात्र, याला कुठलाही कायदेशीर आधार नाही. विषेश म्हणजे निवडणूक आयोगाने या पूर्वीही सर्व पक्षाच्या प्रतिनिधीसमोर EVM ची विषेश तपासणी घेतली होती. मात्र, आज पराभूत झाल्यामुळे अशा रितीने भांडवल करणे आणि सामान्य जनतेची दिशाभूल करण योग्य नाही, अशा शब्दात उज्ज्वल निकम यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना फटकारले आहे. ईव्हीएमवर आरोप करणाऱ्यांकडे जर प्रमाणभूत आधार असेल तर त्यांना सुप्रीम कोर्टात जावं लागेल. परंतु अंदाज आणि संशयावर कुठलीच गोष्ट कोर्टात टिकू शकणार नाह, अशी कायदेशीर अनुभवाची प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:37 11-12-2024