रत्नागिरी : भाट्ये येथील कोहिनूर हॉटेल रस्त्यावर उतारात दोन मोटारींचा अपघात झाला. संशयित मोटार चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत बाळकृष्ण जाधव (रा. साटवली रोड, लांजा) असे संशयित मोटार चालकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ५) सकाळी पावस ते रत्नागिरीकडे येणाऱ्या रस्त्यावर कोहिनूर हॉटेल उतारात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धी सुनील कोकरे या त्यांच्याकडील मोटार ही घेऊन गोळप ते रत्नागिरी अशा येत होत्या. कोहिनूर हॉटेल उतारात आल्या असताना मागून येणारी मोटार वरील संशयित चालक अनंत जाधव यांनी मोटार निष्काळजीपणे चालवून पुढे जाणाऱ्या मोटारीला धडक दिली. यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी पोलिस हवालदार प्रवीण बेदरकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 12/Dec/2024














