रत्नागिरी : शहरानजीकच्या एमआयडीसी फिनोलेक्स कॉलनी येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या एकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार १० डिसेंबर रोजी रात्री ८.३० वा. करण्यात आली.
अक्षय अजय भाटकर (२६, रा. मिऱ्या भाटकरवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस कर्मचारी रुपेश भिसे यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार, मंगळवारी रात्री तो फिनोलेक्स कॉलनीच्या मागील मोकळ्या जागेत झाडीच्या आडोशाला त्याच्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना दारु पित असताना मिळून आला. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 12/Dec/2024














