संगमेश्वर : जुनी निर्लेखित साहित्य खरेदीसाठी २१ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

रत्नागिरी : प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर यांच्याकडील जुनी निर्लेखित साहित्य खरेदीसाठी इच्छुक खरेदीदारांनी आपले देकार बंद पाकिटातून दि. २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा. सादर करण्याचे आवाहन संगमेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य र. वि. कोकरे यांनी केले आहे. प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर यांच्याकडे हत्यारे (लोखंडी), तांबे (वायरच्या तुकड्यातील) तांबे, अल्युमिनियम, (थोड्या प्रमाणात) लाकूड (थोड्या प्रमाणात) यांचे प्रति किलो दर सर्व बाबी उपलब्धतेनुसार (विक्रीसाठी) उपलब्ध आहे. या साहित्याची प्रती किलो दराप्रमाणे विक्री करावयाची असून इच्छुक खरेदीदारानी आपले देकार बंद पाकिटातून प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था संगमेश्वर यांच्या कार्यालयात दि. २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यत साहित्याची प्रत्यक्ष पाहणी करून आणून द्यावीत निविदा सादर करताना ती संगणकीय टंकलिखित असावी. हस्तलिखित सादर करू नये. हस्तलिखित ग्राह्य धरली जाणार नाही. निविदेमध्ये शब्दात अथवा अंकात कोठेही खाडाखोड नसावी. खाडाखोड ग्राह्य धरली जाणार नाही. अधिक माहीतीसाठी आवश्यकता भासल्यास ९३५९५९७४८४ या भ्रमण दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 12/Dec/2024