गुहागर : मच्छीमार बोटीवरील तांडेल रविंद्र काशीराम नाटेकर यांच्यावर भ्याड हल्ला करून निघृण हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी अखंड खारवी समाज रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील खारवी समाज समितीतर्फे दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता गुहागर तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. २० ऑक्टोबर रोजी साखरी आगर येथील मच्छीमार रविंद्र नाटेकर यांच्यावर मासेमारी करताना त्यांच्याच बोटीवरील झारखंड येथील खलाशी म्हणून काम करणाऱ्या जयप्रकाश विश्वकर्मा याने सुरीने भ्याड हल्ला करून निघृण हत्या केली. तसेच बोट पेटवून दिली होती. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
हे पाशवी कृत्य करणाऱ्या नराधमाला फाशी द्यावी, जलदगती न्यायालयात खटला चालवावा, या घटनेचा निःपक्षपातपणे पोलिस तपास व्हावा, अशा मागणीसाठी महेश नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 12/Dec/2024














