‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात लांजा क्र. ५ शाळा विभागात तिसरे

रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ अभियानात विभाग जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. विभागामध्ये लांजा नं. ५ शाळेला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत लांजा तालुक्यातील मांडकी खुर्द व महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अॅण्ड ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कडवई, संगमेश्वरने प्रथम क्रमांक पटकावला.

महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात आलेल्या माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या अभियानात तालुका, विभाग व जिल्हास्तरीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान विजेता ठरलेल्या शाळा जाहीर करण्यात आल्या आहेत. विभागस्तरावर लांजा क्र. ५ शाळेला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.

जिल्हास्तरीय शासकीय गटात प्रथम जि.प. प्राथ. शाळा मांडकी खुर्द, चिपळूण, द्वितीय जि. प. प्राथ. शाळा मळे, दापोली, तृतीय जि. प. प्राथमिक शाळा पूर, संगमेश्वर. तसेच खासगी गट प्रथम महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अॅण्ड ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स, कडवई, संगमेश्वर, द्वितीय न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे, दापोली, तृतीय रामेश्वर विद्यालय कोंडगे, लांजा असे क्रमांक जाहीर झाले.

अशी असतील बक्षिसे
शाळांना तालुकास्तरावर प्रथम ३ लाख, द्वितीय २ लाख, तृतीय १ लाख तर जिल्हास्तरीय प्रथम ११ लाख, दुसरे ५ लाख, तिसरे ३ लाख विभागस्तरीय प्रथम २१ लाख, द्वितीय १५ लाख तर तृतीय ११ लाख अशी बक्षिसे असणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 12/Dec/2024