रत्नागिरी : आठ वर्षीय मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या वृद्धाविरोधात गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातीलच एका आठ वर्षीय मुलीशी गैरप्रकार करणाऱ्या वृद्धाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना रविवार ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. सुमारास घडली आहे.

श्रीकांत नारायण पेडामकर (६५, रा. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित वृद्धाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पीडितेच्या नातेवाईकांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

रविवारी सकाळी संशयित वृद्ध हा पीडित अल्पवयीन मुलीला चिरफळे गोळा करण्यासाठी सोबत घेऊन गेला होता. त्याठिकाणी त्याने पीडीतेशी गैरप्रकार केला. मुलीने घरी आल्यानंतर सर्व हकिगत आपल्या पालकांना सांगितली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 12/Dec/2024