रत्नागिरी : व्यक्तीला आपला व्यक्तिमत्त्व विकास साधण्यासाठी हक्कांची नितांत गरज असते. व्यक्तीला जन्मतः मिळालेले हक्क म्हणजे मानवी हक्क होय. समाजातमानवी हक्कविषयक जनजागृती होणे गरजेचे आहे, असे मत गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्रा. नीलेश पाटील यांनी व्यक्त केले.
मानवी हक्क दिनानिमित्त गोगटे जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालय आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे कला शाखा विभागप्रमुख प्रा. वैभव कानिटकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयातील शास्त्र शाखा विभागप्रमुख प्रा. दिलीपकुमार शिंगाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन कार्यक्रम समिती प्रमुख प्रा. विस्मया कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, शिक्षक कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 12/Dec/2024














