सप्तलिंगीतील १२ ज्योतिर्लिंग दर्शनाने पर्यटक भारावले !

देवरुख : देवनगरी देवरुख अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांमधील सप्तलिंगी दर्शन अंतर्गत १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन याचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील व्यावसायिक व उद्योजकांनी घेऊन या सप्तलिंगी दर्शनाने पर्यटक भारावून गेले. या पवित्र नदीचे जल हे पर्यटक पूजनासाठी घेऊन गेले आहेत.

देवरुख परिसराला सुजलाम सुफलाम करून वाहणाऱ्या सप्तलिंगी नदी च्या काठावर सात शिवलिंग आहेत. यामुळेच या नदीला सप्तलिंगी हे नाव पडले आहे. जरी सातलिंग या नदीच्या काठावर असली तरीही नदीच्या संपूर्ण प्रवाह शेजारी एकूण १२ शिवलिंग दिसून येतात. यामुळे १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन सप्तलिंगी परिक्रमा करताना घडून येते. ही संपूर्ण बारा लिंग ही ज्योतिर्लिंगातील देवस्थानाप्रमाणेच दिसून येतात. यामुळे या सप्तलिंगीची परिक्रमा करण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून अनेक पर्यटक येतात.

या संपूर्ण सप्तलिंगी नदीची परिक्रमा करताना काशीविश्वेश्व ते रामेश्वर अशी एक यात्रा देखील घडते. या यात्रेत पर्यटक काशीविश्वेश्वर नदीचे जल रामेश्वरावर अर्पण करतात तर रामेश्वर येथील जल काशीविश्वेश्वरावर अर्पण करून ही छोटी यात्रा पूर्ण करतात. ही यात्रा देखील त्यांनी पूर्ण केली. सप्तलिंगी नदीच्या काठावर मूळ मार्लेश्वर, वाडेश्वर, निळकंठेश्वर, टिकलेश्वर, काशीविश्वेश्वर, दुबळेश्वर, रामेश्वर, सांबसदाशिव, हरिहरेश्वर, सोमेश्वर, चंद्रेश्वर व आकार वाकोबा अशा या १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडते. ही यात्रा व्यावसायिक व सामाजक सेवक निखिल कोळवणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली आहे.

या १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शनाने मन प्रसन्न झाले, अशा भावना कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या पर्यटकांनी व्यक्त केल्या. परत जाताना पर्यटकांनी सप्तलिंगीचे पवित्र जल आठवण म्हणून व पुजेसाठी नेले आहे. पर्यटक श्रीकांत नागवेकर, राजन सबनीस, श्रीकांत सातपुते, संजय गोडे, राजू अंबिके, उत्तम कुलकर्णी यांच्या समवेत उद्योजक सुनील कोळवणकर यांनी ही परिक्रमा पूर्ण केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 12/Dec/2024