रत्नागिरी : तालुक्यातील ढोकमळे समुद्रकिनाऱ्यावर अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (ता. १५) सायंकाळी सहाच्या सुमारास ढोकमळे समुद्रकिनारी निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गावातील सागररक्षक दलाच्या सदस्या यांनी फोन करून गावचे पोलिस पाटील यांना समुद्रकिनारी मृतदेह दिसत असल्याचे कळवले. त्यानंतर पोलिस पाटील यांनी तेथे जाऊन खात्री केली असता एक अनोळखी पुरुष मृतावस्थेत आढळला. त्याचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षांचे आहे. त्याचे नाव-गाव समजून येत नाही. या प्रकरणी पोलिस पाटील यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 17-09-2024