दापोली : राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधिलकीला चालना देते आणि ग्रामीण भागातील समस्यांची समज विकसित करते. विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार, नेतृत्वगुण आणि सेवा वृत्ती मिळवता येते. समाजसेवेसाठी सज्ज करणाऱ्या या शिबिरामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे अध्यक्षीय भाषणात डॉ. दशरथ भोसले यांनी सांगितले.
वराडकर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबिराचे उद्घाटन साखळोली येथे झाले. शिबिराचे उद्घाटन आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाऊंडेशनचे कार्यवाह डॉ. दशरथ भोसले आणि संचालक जानकीताई बेलोसे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात १४ डिसेंबरपर्यंत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
विद्यार्थ्यांना केवळ समाजसेवेसाठीच नव्हे, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी देखील हे शिबिर उपयुक्त ठरेल, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांनी सांगितले. साखळोली गावच्या सरपंच दीक्षा तांबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जानकी ताई बेलोसे यांनी विद्यार्थ्यांना विचारांची प्रेरणा शब्दातून दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयश्री गव्हाणे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. उत्कर्षा गुरव यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रा. जनार्दन गिरमकर यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 12/Dec/2024














