रत्नागिरी : 26 डिसेंबर रोजी शासकीय तलाव साळवी स्टॉप येथे आ. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार श्री जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा ही रत्नागिरी जिल्हा एक्वटीक असोसिएशन रत्नागिरी यांच्या मान्यतेने एक्वा टेक्निक्स स्विमिंग अकॅडमी यांनी आयोजित केली आहे. सदर स्पर्धेत पाच वर्षा आतील मुले व मुली ते साठ वर्षाखालील पुरुष व महिला अश्या 10 गटांमध्ये खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश फॉर्म जमा करण्याची शेवटची दिनांक 23 डिसेंबर अशी असेल. स्पर्धेत रत्नागिरी जिह्यामधील स्पर्धक सहभागी होऊ शकतात.
सदर स्पर्धेत जास्तीतजास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन एक्वा टेक्निक्स स्विमिंग अकॅडमी तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 7775048888 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:01 12-12-2024














