रत्नागिरी : १ जानेवारीपासून सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल, परिचालन प्रशिक्षण

रत्नागिरी : जिल्ह्यातील मच्छीमार युवकांसाठी सहा महिने मुदतीचा सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम १ जानेवारी २०२५ पासून सुरू होत आहे. याचा लाभ घेण्यासाठी युवकांनी २७ डिसेंबरपर्यंत मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पेठकिल्ला, ता. जि. रत्नागिरी येथे अर्ज करावेत, असे आवाहन मत्स्यव्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जी. द. सावंत यांनी केले आहे.

प्रशिक्षण कालावधी १ जानेवारी ते ३० जून २०२५ (६ महिने) असणार आहे. यासाठी आवश्यक पात्रता अशी : उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष असावे. (आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे). उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक. (शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडणे). क्रियाशिल मच्छिमार व किमान एक वर्ष मासेमारीचा अनुभव असावा. (विहीत नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी.) प्रशिक्षण शुल्क प्रतिमाह ४५० रुपये प्रमाणे सहा महिन्यांचे २७०० रुपये मात्र. दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्रतिमाह १०० रुपये प्रमाणे सहा महिन्यांचे ६०० रुपये मात्र असेल. (दारिद्र रेषेखालील असल्यास ग्रामसेवक/गटविकास अधिकारी पं.स. यांचा दाखला जोडावा) राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) अंतर्गत योजनेतून अर्थसहाय्य घेवून मच्छिमारी नौका बांधता येतील. सागरी नौकांवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध होवू शकते.

अधिक माहितीसाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, जी. द. सावंत, ईमेल :- ftcrtn@gmail.com मोबाईल व व्हाट्सॲप क्रमांक ९४२२३७१९०१ येथे संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:54 PM 12/Dec/2024