रत्नागिरी : ख्रिसमस सणानिमित्त कोकणात आणि पुढे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर तीन हिवाळी विशेष (विंटर स्पेशल) गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई सीएसएमटी – करमाळी-मुंबई सीएसएमटी विशेष (दररोज), लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक) आणि पुणे जंक्शन – करमाळी – पुणे जंक्शन विशेष (साप्ताहिक) या गाड्यांचा समावेश असून, १४ डिसेंबर रोजी सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होणार आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी : गाडी क्र. ०११५१/०११५२ मुंबई सीएसएमटी – करमाळी – मुंबई सीएसएमटी विशेष (डेली) : गाडी क्र. ०११५१ मुंबई सीएसएमटी – करमाळी स्पेशल (दैनिक) २० डिसेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ पर्यंत मुंबई सीएसएमटी येथून दररोज रात्री १२.२० वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०११५२ करमाळी – मुंबई सीएसएमटी स्पेशल (दैनिक) २० डिसेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ पर्यंत दररोज दुपारी २.१५ वाजता करमाळी येथून सुटेल ती दुसऱ्या दिवशी ३ वाजून ४५ मिनिटांनी मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.
ही गाडी गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या स्थानकांवर थांबणार असून, एकूण २२ कोचची रचना असेल. यात फर्स्ट एसी -01कोच. कंपोझिट (फर्स्ट एसी + 2 टियर एसी) – 01 कोच, 2 टियर एसी – 03 कोच, 3 टियर एसी – 11 कोच, स्लीपर – 02 कोच, जनरल – 02 कोच, SLR – 02 यांचा समावेश असेल.
गाडी क्र. ०१४६३/०१४६४ लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक) : गाडी क्रमांक ०१४६३ लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली स्पेशल (साप्ताहिक) लोकमान्य टिळक (टी) येथून गुरुवारी म्हणजे १९ डिसेंबर, २६ डिसेंबर, २ जानेवारी आणि ९ जानेवारी २०२५ या दिवशी दुपारी ४ वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी कोचुवेलीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१४६४ कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक) शनिवारी म्हणजे २१ डिसेंबर, २८ डिसेंबर, ४ जानेवारी आणि ११ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी वाजता कोचुवेली येथून सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक (टी) येथे रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मोकांबिका रोड बायंडूर (एच), कुंदापुरा, उडुपी, सुरथकल, मंगळुरु जं., कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर जं. , त्रिशूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम आणि कोल्लम जंक्शन स्टेशन येथे थांबेल. या गाडीची रचना 2 टायर एसी – 02 कोच, 3 टायर एसी – 06 कोच, स्लीपर – 09 कोच, जनरल – 03 कोच, जनरेटर कार – 01, एसएलआर – 01 अशी एकूण २२ एलएचबी कोचची असेल.
ट्रेन क्र. ०१४०७/०१४०८ पुणे जं. – करमाळी – पुणे जं. विशेष (साप्ताहिक) : गाडी क्रमांक ०१४०७ पुणे जं. – करमाळी विशेष (साप्ताहिक) बुधवारी म्हणजे २५ डिसेंबर, १ जानेवारी आणि ८ जानेवारी २०२५ रोजी पुणे जंक्शन येथून सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी सुटेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१४०८ करमाळी – पुणे जं. विशेष (साप्ताहिक) बुधवारी म्हणजे २५ डिसेंबर, १ जानेवारी आणि ८ जानेवारी २०२५ रोजी रात्री १० वाजता करमाळी येथून सुटेल ती दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता पुणे जंक्शनला पोहोचेल. ही गाडी चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबेल. फर्स्ट एसी – 01 कोच, 2 टायर एसी – 01 कोच, 3 टायर एसी – 02 कोच, स्लीपर – 05 कोच, जनरल – 06 डबे, SLR – 02 अशी एकूण १७ कोचची रचना असेल.
वरील सर्व ट्रेन क्रमांकांसाठी बुकिंग १४ डिसेंबर २०२४ रोजी सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC वेबसाइटवर उघडतील. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे कडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 PM 12/Dec/2024














