रत्नागिरी : जिंदाल कंपनीमधून वायुगळती झाल्याने जयगड येथील 30 शालेय विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जयगड येथील नांदीवडे माध्यमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना वायुगळतीचा त्रास जाणवू लागला. जिंदाल कंपनीमध्ये मेंटेनन्स चे काम चालू असताना ही वायू गळती झाल्याचे बोलले जात आहे.
उलट्या आणि मळमळण्याचा त्रास होऊ लागल्याने सुमारे 30 ते 40 शालेय विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
काही विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात, तर खासगी रुग्णालयात हलवलं आहे.
जिंदाल कंपनीच्या टाक्यांचा मेंटेनन्स सुरू असताना गॅस लिकेज झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:44 12-12-2024














