रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर येथे मोठा अपघात होता होता टळला आहे. पेट्रोल वाहतूक करणाऱ्या एका टँकरच्या चाकाला अचानक आग लागली. ही घटना लक्षात येताच तत्काळ अग्निशामन यंत्रणेला बोलवण्यात आलं. या टँकरचे ब्रेक लाइनर प्रचंड गरम होऊन टायरने पेट घेतल्याची घटना घडली. अग्निशमन यंत्रणा त्वरित पोचल्याने मोठा अनर्थ टळला. आज रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे.













