रत्नागिरी : कर्जाचे हफ्ते न भरल्याच्या रागातून एका तरुणाला दोघांनी अश्लिल शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना मंगळवार १० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वा. सुमारास अभ्युदयनगर येथील बालाजी फायनान्स ऑफिस समोर घडली.
या प्रकरणी राजा कुठेकर (वय २७, रा. झाडगाव, रत्नागिरी) आणि प्रवीण (वय ४५ पूर्ण नाव पत्ता माहित नाही) या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात अजय पाटील (वय ३३,रा. मिरजोळे, जांभुळफाटा, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार, सन २०२१ मध्ये त्यांनी बालाजी फायनान्सकडून ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु, काही कारणांमुळे त्यांना कर्जाचे हफ्ते भरता आले नाहीत. मंगळवार, १० डिसेंबर रोजी संशयित राजा कुठेकरने अजय पाटीलला ऑफिसजवळ घेऊन गेला. त्यानंतर ऑफिसमधील संशयित प्रवीणने फिर्यादीच्या डोक्यात आणि पाठीवर मानेजवळ लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच दोघांनीही त्याला त्याच्या खिशातील ४ हजार ३७० रुपये आणि दोन मोबाईल काढून घेतले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 13/Dec/2024














