देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी केतकवणेवाडी येथील जल जीवन मिशन योजनेंतर्गत झालेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. येथील ग्रामस्थांनी येत्या २६ जानेवारीला उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
या कामांची माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्याचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव, संगमेश्वर तालुकाध्यक्ष शेखर जोगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच पाहणी करण्यात आली. नित्कृष्ट दर्जाचे साहित्य, नियमांना फाटे फोडून चुकीच्या पद्धतीने झालेली कामे, अपूर्ण असलेली कामे यामुळे पंतप्रधान मोदींच्या ‘हर घर पानी’ या योजनेला ‘घर घर’ लागल्याचे चित्र आहे. अपूर्ण असलेली कामे पूर्ण दाखवून निधीची मागणी करण्यात येत आहे.
लोकप्रतिनिधींनी जनतेच्या विकास कामांमध्ये लक्ष घालून त्यांच्या अडचणी दूर कराव्यात. दोषी अधिकारी व अभियंते यांच्यावर कठोर कारवाई करावी असे जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव, संगमेश्वर तालुकाध्यक्ष शेखर जोगळे यांनी ग्रामस्थांसोबत झालेल्या चर्चेवेळी सांगितले. यावेळी वाडीप्रमुख निशिकांत चव्हाण, मारुती चव्हाण, रवींद्र चव्हाण, महासंघाचे पदाधिकारी कार्याध्यक्ष विजय चव्हाण, दीपक भेरे, प्रकाश खांडेकर, मुकेश चव्हाण, सुशील चव्हाण व इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 13/Dec/2024














