रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा शाळेच्या मैदानावर खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात झाल्या.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. अरविंद नवेले (जिद्दी माउंटेनेरिंग) प्राथमिक विभागाचे शाळा समिती अध्यक्ष सुहास पटवर्धन, पालक प्रतिनिधी देसाई शाळेच्या मुख्याध्यापिका पाटणकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मुरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गांगण यांनी केले. क्रीडास्पर्धाची सर्व व्यवस्था क्रीडा विभाग आणि इतर शिक्षक यांनी उत्तम प्रकारे नियोजनात झाली. या वेळी शाळेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 13-12-2024














