संगमेश्वर : बुरंबाड ग्रामपंचायतीतर्फे श्रमदानातून वनराई बंधारे

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड गावात, ग्रामपंचायतीतर्फे वनराई बंधारे बांधण्यात आले. सरपंच नम्रता कवळकर यांनी स्वतः बंधाऱ्याचे काम केल्याने एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या सोबत उपसरपंच रवींद्र पवार यांनी देखील मेहनत घेतली. पाणी अडवा, पाणी जिरवा चा नारा देत गावात दोन वनराई बंधारे बांधण्यात आले. यासाठी अंगणवाडी सेविका, आशासेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, योजना दूत यांनी मेहनत घेतली. गावातील भूजल पातळी वाढावी या उद्देशाने या वनराई बंधाऱ्यांची बांधणी करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 13/Dec/2024