चिपळूण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोळकेवाडी बोलाडवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी बुधवारी (ता. ११) सदिच्छा भेट दिली आणि दर्शन घेतले. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरासाठी त्यांच्या योगदानातून बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.
श्री क्षेत्र बोलाडवाडी कोळकेवाडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरासाठी ग्रामस्थांची संरक्षक भिंतीची मागणी होती. या भिंतीचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन प्रशांत यादव यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी स्वखर्चातून ही संरक्षक भिंत बांधून दिली. यावेळी प्रशांत यादव यांचा ग्रामस्थांच्यावतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख विनोद झगडे, अलोरेचे माजी सरपंच भाऊ मोहिते यांच्यासह वाघजाई केदार देवस्थानचे अध्यक्ष जयवंत शिंदे, कोळकेवाडीचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, सदाशिव बैकर महाराज, दीपक शिंदे, निवृत्ती मुकनाक महाराज, अशोक शिगवण, सीताराम शिगवण महाराज, योगेश बोलाडे महाराज यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 13/Dec/2024














