लांजा : लोकमान्य वाचनालयतील वक्तृत्व स्पर्धेत वृंदा कोतापकर प्रथम

लांजा : लोकमान्य वाचनालय लांजा या संस्थेच्यावतीने महिलांसाठी तालुकास्तरीय खुल्या गटात वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये वृंदा कोतापकर हिने प्रथम क्रमांक पटकावला तर अनुजा कांबळे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.

महिला तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत २६ महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पुस्तकः वणव्यामध्ये गारव्यासारखे, सोशल मिडीया आणि आजची तरुणी, मानवी नात्यातील हरवत जाणारा ओलावा, मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा आणि आपले कर्तव्य, स्त्री आरोग्य मानसिक आणि शारीरिक या विषयांवर स्पर्धकांनी आपले विचार मांडताना उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. वर्षा ब्रीद यांनी तृतीय क्रमांक पटकावला तर उत्तेजनार्थ क्रमांक स्वानंदी जोगळेकर आणि प्रीती भिडे यांनी मिळविला. या स्पर्धेचे परीक्षण रमाकांत सावंत व तेंडुलकर यांनी केले.

यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष योगेश वाघधरे, कार्यवाह उमेश केसरकर, सल्लागार विजय बेर्डे, रमाकांत सावंत, संचालक विजय नारकर, विजय हटकर, विजयालक्ष्मी देवगोजी, ललिता भिंगे, तेंडुलकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 13/Dec/2024