रत्नागिरी : संस्कृत विश्वविद्यालय उपकेंद्रात गीता जयंती साजरी

रत्नागिरी : प्रत्येकाच्या दृष्टिकोनानुसार गीता प्रत्येकाला उपयोगी आहे. बालांसाठी बालसाहित्य म्हणून तर थोरामोठ्यांसाठी एक तत्त्वज्ञान म्हणून आणि युवकांसाठी व्यवस्थापन शास्त्र म्हणून गीतेकडे पाहिले जाते.

त्यामुळे आबालवृद्ध अशा सर्वांसाठी गीता उपयोगी असल्याचे प्रतिपादन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले. गीता जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात गीता जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने उपस्थितांना संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी उद्बोधन केले. शिवाय गीतेतील बाराव्या अध्यायाचे सामूहिक पठण करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, रत्नागिरी उपकेंद्रातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 13-12-2024