रत्नागिरी : भगवती बंदर येथील महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मालकीच्या १७ आंबा कलमांचा लिलाव होणार आहे. १७ डिसेंबरला दुपारी ३ वा. बंदर निरीक्षक, महाराष्ट्र सागरी मंडळ, बंदर कार्यालय, मांडवी जेट्टीजवळ हा लिलाव होईल.
इच्छुकांनी लिलावाच्या अटी/शर्ती व झाडांचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती ही बंदर निरीक्षक, रत्नागिरी बंदर कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन प्राप्त करून घ्यावी, असे महाराष्ट्र सागरी मंडळ, रत्नागिरी बंदरे समुहाचे प्रादेशिक बंदर अधिकारी यांनी कळवले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 13-12-2024














