खेड : गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोतांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शरदचंद्र पवार पक्षाची मागणी

खेड : शरदचंद्र पवार यांच्या विरोधात जागूनबुजून आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे खेड तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

हे निवदेन देताना तालुकाध्यक्ष विनायक निकम, ज्येष्ठ कार्यकर्ते जलालभाई राजपूरकर, मंगेश भागवत, फैप्याज मणियार आदी उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातील मरकडवाडी येथे जाहीर सभेत दोघांनी शरद पवार यांच्याबद्दल अवमानात्मक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यात शांतताभंग होऊन जातीय व सामाजिक तणाव तेढ निर्माण होऊ शकते. त्यांनी जाणीवपूर्वक वक्तव्य केले आहे. हे कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचे असल्यामुळे फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 13/Dec/2024