चिपळूण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची जपणूक करत देश- महाराष्ट्र उभा करण्याचे मोठे काम शरद पवार यांनी केले आहे. शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत आहेत. या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश ते निवडणूक प्रचार, मतमोजणी व पराभवानंतर शरद पवार यांचे मोठे पाठबळ मिळाले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी शरद पवारांच्या वाढदिनी हॉटेल अभिरुचीच्या सभागृहात ज्येष्ठांच्या सन्मान सोहळ्यात प्रतिपादन करतांना शरद पवारांची कधीही साथ सोडणार नाही, अशी ग्वाही यादव यांनी यावेळी दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार रमेश कदम, चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, शहराध्यक्ष रतन पवार, माजी नगरसेवक शिरीष काटकर, ज्येष्ठ नेते सुचय रेडीज, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. दीपिका कोतवडेकर, शहराध्यक्षा सौ. डॉ. रेहमत जबले, शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख विनोद झगडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराव देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष विलास चिपळूणकर, माजी नगरसेवक अविनाश केळस्कर, सिकंदर नाईकवाडी, सुरेश मांदाडकर, दिनेश शिंदे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी संचालिका माधुरी गोखले, चिपळूण नागरीच्या संचालिका ऍड. नयना पवार, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष महंमद पाते, ज्येष्ठ पत्रकार सुहास बारटक्के, युवक तालुकाध्यक्ष रोहन नलावडे, राष्ट्रवादी महिला आघाडी तालुका कार्याध्यक्ष सौ. अंजली कदम, शहर कार्याध्यक्ष सौ. रुही खेडेकर, मेस्त्री समाजाचे नेते वासुदेव मेस्त्री, राष्ट्रवादीचे तालुका खजिनदार शमून घारे, माजी नगरसेविका सौ. सीमा चाळके, कोवसच्या सुमती जांभेकर, राष्ट्रवादी युवकचे तालुका उपाध्यक्ष राहुल पवार, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष राकेश दाते, राष्ट्रवादी युवकचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गुलजार कुरवले, भिलेच्या सरपंच आदिती गुढेकर, अफजल कच्छी आदी उपस्थित होते.
यावेळी यादव पुढे म्हणाले की, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासह अन्य नेत्यांच्या बरोबरीने शरद पवारांनी देश- महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. शरद पवार असतील किंवा अगोदरच्या नेत्यांनी सभागृह चालवत असताना एकमेकांसह विरोधकांचा सन्मान राखला. मात्र, आता एकेरीवर आल्याचे पहावयास मिळते, याची खंत आहे, असे मत यादव यांनी यावेळी मांडले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा करण्याच्या दिल्या सुचना!
यादव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या आठवणींना उजाळा देतांना शरद पवारांनी वाशिष्ठी डेअरी असो, चिपळूण नागरी पतसंस्था असो, या दोन्ही संस्थांची आपुलकीने माहिती जाणून घेतली. तत्पूर्वी पवारांकडे या दोन्ही संस्थांविषयी इंत्यभूत माहिती होती, हे पहावयास मिळाले. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशादरम्यान चिपळूणमध्ये पुन्हा पक्ष उभा करण्याच्या दृष्टीने कामाला लागा, अशा सूचना केल्या नंतर विधानसभा निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीतर्फे आपल्या उमेदवारीची घोषणा झाली. त्यानंतर शरद पवारांना भेटायला गेलो. तेव्हा आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. रमेश कदम आणि तुम्ही दोघांनी मला ही लढाई जिंकून द्यायची आहे, त्यासाठी माझी ताकद तुमच्या पाठीशी आहे. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर निवडणूक प्रचारादरम्यान दोन वेळा फोन करून काही अडचण आहे का ? अशी विचारणा केली. यावरून देशातील एकमेव नेता असेल की जे उमेदवारला स्वतः फोन करून तुम्हाला काय अडचण आहे का ? याची विचारणा करतात. यावरून शरद पवारांची काम करण्याची पद्धत पाहून आपण भारावून गेलो, अशी आठवण यादव यांनी यावेळी काढली.
तुम्ही धीर धरा, कामाला लागा; शरद पवारांकडून दिलासा
तसेच ते पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणूक मतमोजणी दरम्यान शरद पवारांनी कुटूंबियांशी संपर्क साधून माहिती घेतली. एवढे प्रेम आणि पाठीशी असणारा नेता आपल्याला त्यावेळी पहावयास मिळाला. साहेबांचा फोन आणि ती एवढी काळजी आपली घेत आहेत. याच्यापेक्षा आपल्यासाठी मोठी गोष्ट नाही. पराभव त्याक्षणी विसरून गेलो. विचारांची लढाई लढत असताना महाराष्ट्रातल्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी उभे असल्याचे पहावयास मिळाले. यामुळे असा नेता पुन्हा होणार नाही. नंतर आम्ही सहकुटुंब सहपरिवार कराड येथे शरद पवारांना भेटायला गेलो. तेव्हा ते म्हणाले होते की, हा जो पराभव झाला आहे. त्याची काळजी करण्याचे कारण नाही. हा जनतेने केलेला पराभव नाही. तुम्ही धीर धरा कामाला लागा.
सगळं काही व्यवस्थित होईल. लोकांनी तुम्हाला त्यांचं जे मतदान दिलं आहे. ते फार मोठे आहे. शरद पवारांकडून एवढ्या पद्धतीने ऊर्जा मिळाल्यानंतर आपल्याला काही कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाही. तो आत्मविश्वास पाहिला की, पक्षीय काम करण्याची प्रेरणा मिळते आहे, असे यादव यांनी यावेळी नमूद केले.
शरद पवारांची साथ कधीही सोडणार नाही।
निवडणुकीच्या पराभवानंतर आपण भाजपमध्ये जाणार अशा अफवा, चर्चा सुरू होत्या. मात्र, शरद पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली ९० हजार लोकांनी आपल्यावरती प्रेम केलं. या प्रेमातून उतराई होण्यासाठी दुसऱ्या कुठे जायचे गरज नाही. या मंडळींच्या हृदयात जे स्थान आहे. हीच मोठी आपल्या कामाची पोच पावती आहे. विचारांची लढाई लढलो. प्रचंड मोठी दरी होती.
काय होणार? या सगळ्या गोष्टीची कल्पना होती. किती ताकद समोरच्याकडे याची मला कल्पना होती. तरीसुद्धा मला माहित होतं की मी लढणार आहे ती माझ्या विचारांची लढाईसाठी आणि आज तीच लढाई मला पुढे घेऊन जायचे राजकीय स्थित्यंतर बदलतील राहतील काही माहित नाही. त्या राजकीय स्थित्यंतरामध्ये आपलं भविष्य काही आहे ते माहीत नाही. पण एक मात्र निश्चित आहे, की ज्या लोकांनी साथ केली. त्या लोकांचा विश्वास जपण्याचं काम ह्या पुढच्या काळात करत राहणार.
शरद पवारांसोबत पुढच्या काळात राहणार असून आपल्याला या ठिकाणी सांगतो ज्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या निवडणुकीत दिवसरात्र मेहनत घेतली. त्या प्रत्येक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्या सोबत राहणार आणि त्या प्रत्येक कार्यकर्त्याला जिथे जिथे शक्य आहे, तिथं ताकद देण्याचं काम करणार, अशी ग्वाही यादव यांनी यावेळी शेवटी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:51 PM 13/Dec/2024














