गुहागर : शृंगारतळी बाजारपेठेमध्ये गुहागर पोलिस व होमगार्ड यांच्याकडून वाहतुकीचे योग्य नियोजन केले. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना गणेशभक्तांना करावा लागला नाही. गणेशोत्सवादरम्यान दिवस-रात्र तसेच ऊन-पावसात सेवा करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या हस्ते पोलिस उपनिरीक्षक संदीप भोपळे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मनसे शेतकरी तालुकाध्यक्ष प्रसाद कुष्टे, पित विभागप्रमुख नितीन कारकर, महाराष्ट्र सैनिक विवेक शिर्के, दिलीप आगरे, निकिता कारकर, विराज साळवी आदी उपस्थित होते.
गणेशोत्सवादरम्यान हजारो ग्राहकांनी शृंगारतळी बाजारपेठमध्ये गर्दी केली होती. बाजारपेठेच्या मध्यभागी एसटी थांबा असल्याने या ठिकाणी नो पार्किंगचा फलक लावण्यात आला होता. नो पार्किंग असल्याने प्रवाशांना एसटीमध्ये चढताना व उतरताना अडचण निर्माण झाली नाही. नो पार्किंग जागेमध्ये इतर कुठलेही वाहन उभे राहणार नाही याची काळजी पोलिस व होमगार्ड यांच्याकडून घेतली जात होती.