चिपळूण : ‘धूमस्टाईल’ने एसटी चालवणाऱ्या चालकाची गाडी रोखली

चिपळूण : कुर्ला बेस्ट बस प्रकरण ताजे असतानाच मुंबई ते चिपळूणदरम्यान चालकाने ‘धूमस्टाईल’ एसटी चालवत आणल्याचा प्रकार पुढे आला आहे. संतापलेल्या प्रवाशांनी ती बस चिपळूण आगारात अर्धा तास थांबवून ठेवत व्यवस्थापकांकडे चालकाच्या या प्रतापाची तक्रार केली.

हा प्रकार भिंवडी-रत्नागिरी एस.टी. मध्ये शुक्रवारी सायंकाळी घडला. चालकाने आपली चूक मान्य करीत, पुढचा प्रवासात बसची गती योग्य ठेवतो, अशी ग्वाही दिल्यानंतर प्रवाशांच्या संमतीनंतर ती बस पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 AM 14/Dec/2024