देवरूख येथील श्री दत्तात्रेय मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रम

देवरुख : शहरातील श्री देव दत्तात्रेय व श्री देव हनुमान मंदिरामध्ये दत्तजयंतीदिनी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी ६ वाजता दत्तगुरूंवर अभिषेक व दुपारी महानेवैद्य होणार आहे. दुपारी ३.३० वाजता स्वामी समर्थ भजन मंडळ वरचीआळी यांचे सुश्राव्य भजन होणार आहे. सायंकाळी ५ वाजता श्री दत्त जन्मोत्सवाचे कीर्तन रत्नागिरी येथील ह. भ. प. यश सोवनी यांचे होणार आहे. रात्री ७ वाजता श्री देव दत्तात्रय यांची पालखी प्रदक्षिणा होणार आहे. या उत्सवाची सांगता १७ रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाने केली जाणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 14/Dec/2024