राजापूर : गगनगिरी महाराज आश्रमामध्ये आज नेत्र चिकीत्सा शिबिर

राजापूर : राजापूर तालुक्यातील ओणी येथील स्वामी गगनगिरी महाराज आश्रम व रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांचे सौजन्याने १४ रोजी श्री दत्त जन्मोत्सव दिनी, श्री क्षेत्र ओणी आश्रम येथे सकाळी ९.३० ते दुपारी ४ वाजे पर्यंत मोफत नेत्र चिकीत्सा शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी प्रख्यात डॉक्टरांकडून नेत्र तपासणी करण्यात येईल, तरी परिसरातील गरजूंनी यांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन स्वामी उल्हासगिरी महाराज यांनी केले आहे. सायंकाळी ४.३० ते ६ वाजेपर्यंत श्री दत्तजन्मावर ह.भ.प. विलास शहाणे यांचे कीर्तन होणार आहे. दत्तजन्मोत्सव सोहळा झाल्यावर महाप्रसाद देण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 14/Dec/2024